मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (10:14 IST)

महिला डॉक्टर हत्येप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू, विशेष वैद्यकीय फॉरेन्सिक टीम पोहोचली कोलकातामध्ये

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा विनयभंग करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. तसेच दिल्लीहून आता सीबीआयचे पथक या प्रकरणाच्या तपासासाठी कोलकाता येथे पोहोचले. मिळलेल्या माहितीनुसार सीबीआयने दिल्लीहून विशेष वैद्यकीय आणि फॉरेन्सिक टीम पाठवली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने काल दिले होते.
 
मंगळवारी या हत्येचा तपास सीबीआयने हाती घेतला होता. तसेच कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही तासांतच सर्व औपचारिकता पूर्ण केल्या होत्या. न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत केस सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना दिले होते.
 
काय प्रकरण आहे?
कोलकात्याच्या सरकारी हॉस्पिटलच्या सभागृहात विनयभंग करून हत्या करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला. याप्रकरणी शनिवारी एकाला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करत पीडितेच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या इतर अनेक जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या.

Edited By- Dhanashri Naik