शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (17:10 IST)

कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा – पोलिसांचे आवाहन

Celebrate Ganeshotsav by following Corona rules - Police appeal
पुणे – राज्यातील कोरोनाचे संकट अजूनही संपलं नाही त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर पुन्हा एकदा बंधने राहणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करूनच यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.
 
पोलीस आयुक्तालयात बुधवारी सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत हे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाला रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे. 
 
कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन गणेश भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच श्री चे विसर्जन सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करून करावे असे आवाहन अमिताभ गुप्ता यांनी केले.
 
या बैठकीला सह पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजय शिंदे, अशोक मोराळे नामदेव चव्हाण पोलीस उपायुक्त मितेश घट्टे प्रियंका नारनवरे त्यांच्यासह मानाच्या पाचही गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.