शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (15:57 IST)

राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की, शरद पवार संतापले

संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित कालावधीच्या दोन दिवस आधीच गुंडाळण्यात आले. राज्यसभा आणि लोकसभा स्थगित करण्यात आली. राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ सुरू असतानाच महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
या अधिवेशनात विरोधीपक्षांच्या गोंधळामुळे काम फार कमी झाले. या जबाबदार धरताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले की जिन्होंने हद कर दी, लोकतंत्र के अपमान की, वो झूठी बातें न करें संसद के सम्मान की.. 
 
बाहेरून मार्शलला आणून खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्याच दरम्यान राज्यसभेतील गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेजही बाहेर आलं आहे. यात विरोधक राज्यसभेतील वेलमध्ये येऊन गोंधळ घालताना दिसत आहेत.
 
विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायूडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले. पेगासस आणि तीन कृषी कायद्यांसहित वेगवेगळ्या मुद्यांवरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला, कामकाज होऊ दिले नाही.
 
या गोंधळासाठी सरकारला दोष देताना शरद पवार म्हणाले की राज्यसभेत महिला खासदारांवर हल्ला झाला. माझ्या 55 वर्षांच्या संसदीय करिअरमध्ये असे कधीच पाहिले नाही. सभागृहात बाहेरुन 40 पुरुष आणि महिलांना आणण्यात आले. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. साभागृहात हे योग्य झाले नाही.