शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (14:47 IST)

उज्ज्वला योजना 2.0: आता गॅस कनेक्शनसाठी अड्रेस प्रूफची गरज नाही,पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'चा दुसरा टप्पा सुरू केला. उज्ज्वला योजना 2 चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना फार थोड्या औपचारिकता कराव्या लागतील आणि प्रवाशी कामगार कुटुंबांना रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा लावण्याची गरज नाही, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. यासाठी स्व-घोषणा पत्र पुरेसे आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महोबा जिल्ह्यातील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी उज्ज्वला योजना -2 च्या 10 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र सादर केले. ऑनलाइन आयोजित या कार्यक्रमात मोदींनी उज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाच लाभार्थ्यांशी संवाद साधला.
 
अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील गरीब कुटुंबांना एकूण एक कोटी 47 लाख 43 हजार 862 एलपीजी कनेक्शन मोफत देण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेल्या आणि योजनेच्या अंतर्गत नसलेल्या गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळतील. सरकारी प्रवक्त्याच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली.याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील पाच कोटी महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
 
ते म्हणाले की, एप्रिल 2018 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आणि त्यात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना,अंत्योदय अन्न योजना आणि सर्वाधिक मागासवर्गीय वर्गातील महिलांच्या सात श्रेणींचा समावेश आहे. त्याचबरोबर एलपीजी कनेक्शनचे लक्ष्य आठ कोटींपर्यंत वाढवण्यात आले, जे निर्धारित तारखेच्या सात महिने आधी ऑगस्ट 2019 मध्ये मिळवले.
 
2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एक कोटी अधिक एलपीजी कनेक्शन वाढवण्याची तरतूद केली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना -2 अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या या एक कोटी एलपीजी गॅस कनेक्शनच्या अंतर्गत   एक भरलेले सिलेंडर आणि गॅस स्टोव्ह मोफत दिले जातील.