बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (12:41 IST)

महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, वाढणारी थंडी आणि नवीन वर्ष या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रासह 8 राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल यासाठी राज्यांनी आपल्या परिनं पावलं उचलून यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना देत केंद्रानं या 8 राज्यांना सतर्क केलं आहे.
 
महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्राद्वारे या सूचना केल्या आहेत.
 
देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 900 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. शिवाय बुधवारी कोरोना रुग्णांमध्ये 44 टक्क्यांनी वाढ झाली. हा ओमिक्रॉनचा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहं.