रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (08:41 IST)

तुम्हाला चांद्रयान २ चे चंद्रावरील लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पाहता येणार पण कसे तर वाचा

तुम्हाला चांद्रयान २ चे चंद्रावरील लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पाहता येणार पण कसे तर वाचा 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) दिवसेंदिवस गगनभरारी घेत आहे. २२ जुलै रोजी इस्रोने चंद्रयान -२ लाँच केले. हे चांद्रयान २७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरेल. आता भारत सरकारने एका क्विझचे आयोजन केले आहे. या क्विझमधील प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास तुम्हाला चांद्रयान २ चे चंद्रावरील लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पाहता येणार आहे.पाच मिनिटात २० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार भारत सरकारतर्फे घेण्यात येणारी ही क्विझ स्पर्धा १० ऑगस्टपासून सुरू होईल आणि २० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये स्पर्धकाला पाच मिनिटात २० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. इस्रोच्या म्हणण्यानुसार या क्विझच्या विजेत्याला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बसून चांद्रयान -२ चे चंद्रावरील लँडिंग पाहण्याची संधी दिली जाईल.सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील ( मल्टिपल चॉईस) हे सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील. ज्या व्यक्तीने सर्वाधिक प्रश्नांची उत्तरे दिली त्यांना विजेते घोषित केले जाईल. जर दोन किंवा अधिक लोकांनी समान प्रश्न सोडविले असेल तर कमीतकमी कमी वेळात ज्यांनी प्रश्नांची अचूक उत्तरे दिली त्यांना विजयी घोषित केले जाईल. क्विझ दरम्यान, आपण कोणताही प्रश्न वगळू शकता आणि पुढे जाऊ शकता आणि वेळ शिल्लक असल्यास आपण नंतर उत्तर देऊ शकता.