गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (15:56 IST)

रेशनच्या नियमांमध्ये बदल, ‘जन्मदाखला’ जोडणे बंधनकारक

ration card
नवीन रेशन कार्डसाठी आता प्रत्येक सदस्याचा जन्मदाखला जोडणे बंधन कारक आहे. विवाह नंतर प्रत्येक  कुटुंबातील वाढलेल्या सदस्यांची नावे जोडून घेण्यासाठी काही जास्तीच्या कागदपत्रांना जोडण्याची अट आहे. पूर्वीच्या लागणाऱ्या कागदपत्रात काही बदल करण्यात आले आहे. या कागदपत्रांमध्ये लग्नानंतर नाव बदल केलेले राज पत्र, जन्मदाखला, करदात्यांना वेगळी कागदपत्रं जोडणे बंधन कारक आहे.  

लग्नानंतर माहेरच्या रेशनकार्डावरून नाव कमी केल्याचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी केल्याचा दाखला, रेशनच्या दुकानाचा अहवाल, आधारकार्ड, अपत्याचे जन्मप्रमाणपत्र आणि बोनाफाईड असणे आवश्यक. पूर्वी आधारकार्ड, आईचे वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, पासपोर्टसाईज फोटो, उत्पन्नाचा पुरावा, जन्मपूर्वक, दाखला, मार्कशीट, पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड 
 
विहित नमुन्यातील अर्ज, अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र, पूर्वीच्या शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक, नजीकच्या रेशन दुकानाचा क्रमांक, सर्व सदस्यांचे आधारकार्ड प्रत, उत्पन्न प्रमाणपत्र, पगारपत्र, फॉर्म 16, आयटी रिटर्न, पेन्शन ऑर्डर, लाईट बिल, घरपट्टी, खरेदीखत, करारनामा, बँक व गॅस पासबुक आता ही  कागदपत्रे लागतात.