testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

छत्तीसगड निवडणूक 2018: मुख्यमंत्री रमन सिंह सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार

raman singh
Last Modified शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (16:53 IST)
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबर रोजी 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात निवडणुकीत 190 उमेदवार त्यांचे भाग्य उजळण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापैकी राज्याचे मुख्यमंत्री, डॉ. रमन सिंह, असे उमेदवार आहे, जे सर्वाधिक वार्षिक उत्पन्न मिळवतात. रमन यांनी नामांकन भरताना आपल्या शपथपत्रात गेल्या वर्षी त्यांचे वार्षिक उत्पन्न 34 लाख 59 हजार रुपयांपेक्षा जास्त होते असे भरले आहे. तसेच जनता काँग्रेस छत्तिसगढ (जे)चे उमेदवार देवव्रत सिंह हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहे.
रविवारी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि छत्तीसगड इलेक्शन वॉचने जारी केलेल्या आकड्यांनुसार, पहिल्या टप्प्यात 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहे. या टप्प्यात असलेल्या 187 उमेदवारांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या शपथपत्रांचे विश्लेषण केले गेले आहे. तीन उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांचे विश्लेषण होऊ शकले नाही. एडीआर आणि इलेक्शन वॉचद्वारे प्रदान केलेल्या माहितीनुसार, सर्वात श्रीमंत तीन उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री रमन सिंह यांचे देखील नाव आहे. त्यांची एकूण मालमत्ता 10,72,34,236 रुपये आहे. जेव्हा की सर्वात श्रीमंत उमेदवार खैरागडचे जनता काँग्रेस छत्तिसगढ (जे) चे उमेदवार देवव्रत सिंह आहे आणि यांची एकूण मालमत्ता 1,19,55,07,609 रुपये आहे. शपथपत्रांच्या आधारावर केलेल्या विश्लेषणात असे म्हटले गेले की पहिल्या टप्प्याचे उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री रमन सिंह यांची वार्षिक कमाई 2017-18 मध्ये सर्वाधिक होती. त्यांची वार्षिक उत्पन्न 34,59,130 रुपये आहे, तसेच त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 59,83,853 रुपये आहे. या टप्प्यात निवडणूकीच्या स्पर्धकांमध्ये 42 उमेदवार मिलियनेअर आहे. काँग्रेस आणि भाजपाने जेथे 13-13 मिलियनेअर उमेदवार उभे केले आहे, व जनता काँग्रेस छत्तिसगढ (जे) म्हणजे अजित जोगी यांच्या पार्टीने 4 मिलियनेअर उमेदवार उभे केले आहे.
यावेळी निवडणूक लढवणारे सर्वात कमी मालमत्ता राजनांदगावच्या रिपब्लिक पार्टी पक्षाकडून निवडणुकांमध्ये उभ्या राहणार्‍या प्रतिभा वासनिक ह्या आहे. त्यांची एकूण मालमत्ता केवळ 1200 रुपये आहे. याशिवाय 9 उमेदवार आहेत ज्यांची मालमत्ता अडीच हजार ते 51 हजार रुपये आहे. यापैकी पाच उमेदवार स्वतंत्र आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना वीरमरण
राज्यासाठी वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय ...

चीनी फटाके विक्री केली तर होणार मोठा दंड, चीनी फटाके बंद

चीनी फटाके विक्री केली तर होणार मोठा दंड, चीनी फटाके बंद
आपल्या देशातील दिवाळीत मोठ्या प्रमाणात चीनी फटाके नेहमीच विक्री करण्यात येते. परंतू ...

युपी आणि आपले महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य ...

युपी आणि आपले महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य ; राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल
महिलांच्या सुरक्षेबाबतचा राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ...

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा पुन्हा नवा वाद

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा पुन्हा नवा वाद
महात्मा गांधीजी हे राष्ट्रपुत्र असल्याचे वक्तव्य करून भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ...

गायीच्या पोटातून काढलं 52 किलो प्लास्टिक, ऑपरेशनचा खर्च ...

गायीच्या पोटातून काढलं 52 किलो प्लास्टिक, ऑपरेशनचा खर्च केवळ 140 रुपये
चेन्नई- वेटरनरी अॅनिमल साइंस युनिव्हर्सिटीमध्ये एका गायीची सर्जरी करून तिच्या पोटातून 52 ...