बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (16:34 IST)

कर्नाटक : काँग्रेस-जेडीएस आघाडीचा भाजपवर विजय

लोकसभा निवडणूकीआधीच कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीने भाजपवर मोठा विजय मिळवला आहे. कर्नाटक राज्यात तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये भाजपला केवळ एकाच लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. काँग्रेसने बल्लारी या लोकसभा मतदारसंघात तर जेडीएसने जामखंडी, रामनगर आणि मंड्या मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. तर भाजपला शिवमोगा या एकाच लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकांचा हा टीझर असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
 
कर्नाटकातील ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. यामध्ये काँग्रेस-जेडीएसने भाजपला धुळ चारल्याचे मतदानाच्या आकडेवारीवून दिसून येते. बल्लारी हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र काँग्रेसच्या व्ही. एस. उग्रप्पा यांनी भाजपच्या जे. शांथा यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मत घेऊन पराभव केला आहे. जवळपास एक लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसने हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला आहे. जामखंडी या विधानसभेच्या मतदारसंघात काँग्रेसच्या ए.एस.न्यामगौडा यांनी भाजपच्या श्रीकांत कुलकर्णी यांचा ३९,४८० मतांनी विजय मिळवला आहे.