रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (09:05 IST)

शकील झाला दाऊद पासून वेगळा, दोघात वाद

अंडरर्ल्ड डॉन आतंकवादी देशद्रोही  दाऊद इब्राहीम व त्याचा चेला  छोटा शकील वेगळे झाल्याचं वृत्त आहे. ही माहिती गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याच्या सुत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. या बातमीनुसार माहितीनुसार शकील= दाऊदचे रस्ते आता वेगळे झाले.  जवळपास 1980 साली शकीलने मुंबई सोडल्यानंतर दाऊदकडे कराचीच्या रेडक्लिफ भागात राहिले आहे. शकीलने स्वतःचा ठिकाणा बदलला असून तो कुठे आहे ? याबद्दलची माहिती कोणालाही नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसारित केले आहे. 

आर्थिक करणाने दाऊद आणि शकीलचं वेगळं झाले असावेत. अशी शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.यामध्ये  शकील हा दाऊदच्या सगळ्यात जवळच्या लोकांपैकी एक होता.  तो गेल्या तीन दशकांपासून त्याच्यासोबत राहत होता. . दाऊद व शकील दोघांनी मिळून गँग चालविली होती. शकीलचं वय सध्या जवळपास 50 इतकं असावा.  दाऊदचा लहान भाऊ अनीसचा गँगच्या कारभारातील हस्तक्षेपामुळे वाद झाले होते.