1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 24 मार्च 2022 (19:25 IST)

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू होणार, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली मोठी घोषणा

cm pushkar singh dhami
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुष्कर सिंह धामी यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, आम्ही संपूर्ण राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने संमती दर्शवल्याची माहिती त्यांनी दिली. आता लवकरच या विषयावर तज्ज्ञांची एक टीम तयार केली जाईल आणि राज्यभर समान नागरी संहिता लागू केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे जे समान नागरी संहिता लागू करणार आहे.