कर्नाटक : गणपती विसर्जनादरम्यान दगडफेक, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान जातीय संघर्षाची घटना उघडकीस आली आहे. रविवारी मंड्या जिल्ह्यातील मद्दूर शहरात ही घटना घडली. त्यानंतर परिसरात तणाव पसरला आहे, ज्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान जातीय हिंसाचार पसरला. दुसऱ्या समुदायाच्या कथितपणे काही समाजकंटकांनी दगडफेक केली, त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहे आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Edited By- Dhanashri Naik