शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2026 (17:06 IST)

काँग्रेसला मुख्यालय खाली करण्याचे आदेश

National News
काँग्रेस पक्षाला अकबर रोड आणि रायसीना रोडवरील आपली कार्यालये खाली करण्याबाबत अंतिम नोटीस मिळाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाला राजधानीतील आपली दोन जुनी कार्यालये खाली करण्याबाबत अंतिम नोटीस मिळाली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या इस्टेट विभागाने पक्षाला २४, अकबर रोड आणि ५, रायसीना रोड येथील दोन्ही कार्यालये २८ मार्चपर्यंत खाली करण्याचे आदेश दिले आहे. अकबर रोडवरील बंगला १९७८ पासून काँग्रेसचे मुख्यालय म्हणून कार्यरत होता. पक्षाचे कार्यालय तेथे ४८ वर्षे कार्यरत होते आणि अनेक धोरणे तेथेच ठरवण्यात आली होती. गेल्या वर्षी काँग्रेसने कोटला रोडवरील इंदिरा भवनमध्ये आपले नवीन मुख्यालय स्थापन केले, परंतु जुने अकबर रोड कार्यालय वापरात आहे. 
रायसीना रोड कार्यालयात सध्या इंडियन यूथ काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांची कार्यालये आहे. सूत्रांनुसार, ही नोटीस केवळ काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली होती आणि पक्षाला एका आठवड्याचीही मुदत देण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अंतिम नोटीस आहे. काँग्रेसने अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे प्रतिसाद दिलेला नाही. पक्षाच्या सूत्रांनुसार, या अचानक आलेल्या नोटीससंदर्भात एक रणनीती आखली जात असून, गरज पडल्यास काँग्रेस पक्ष न्यायालयातही जाऊ शकतो. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले, "सरकारने आपले नियम सर्वांना समानतेने लागू केले पाहिजेत. कोणत्याही एका पक्षाला लक्ष्य केले जाऊ नये."
Edited By- Dhanashri Naik