1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बेंगळुरू , शनिवार, 14 मार्च 2020 (16:25 IST)

कोरोना : बेंगळुरूतील इन्फोसिसचे कार्यालय केले रिकामी

Corona
इन्फोसिसमधील कर्मचारी कोरोना संशयित असल्याची माहिती येताच इन्फोसिसने बेंगळुरूमधील ऑफिस बंद केले आहे. इन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सायंकाळी याबाबतची माहिती दिली.
 
१९९० सालापासून बेंगळुरूमध्ये इन्फोसिसची कंपनी आहे. या कंपनीमधून डेव्हलोपमेंट सेंटर आणि कॉर्पोरेट हाऊसचं काम चालतं. बेंगळुरू आयटीप्रमुखे गुरुराज देशपांडे यांनी इ-मेलमध्ये म्हटलंय की, इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून हे कार्यालय बंद करण्यात आलं आहे. सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी या जागेची आधी स्वच्छता करण्यात येणार आहे.