मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (14:12 IST)

कोरोनाची ट्यून बंद होणार

Corona's tune will be off Marathi National News In Webdunia Marathi
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होताच या साथीच्या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली होती. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ही ट्यून बंद करण्याचा सरकारचा विचार आहे.
 
सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या कॉलर ट्यूनचा उद्देश पूर्ण झाला आहे. काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे कॉल्स करताना या कॉलर ट्यूनमुळे उशीर होतो. याबाबत माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने (DoT) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (CoA) तसेच मोबाइल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख आहे.