शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (15:11 IST)

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ

आता कोविडची लाट ओसरली असून देशभरात सर्व आर्थिक व्यवहारांना गती मिळाली आहे. तरीही या काळात कोणतेही गरीब आणि दुर्बल घटक कुटुंब उपाशी राहू नये या साठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी केंद्र मंत्री मंडळाच्या  शनिवारी झालेल्या बैठकीत प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या सहाव्या टप्प्याला आणखी सहा महिने म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. 
 
या योजनेचा पाचवा टप्पा, मार्च 2022 मध्ये संपणार असून या योजनेची अंमलबजावणी एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आली. ही योजना जगातली सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना आहे. या योजनेवर सरकारने आतापर्यंत 2.60 लाख कोटी रुपये निधी खर्च केले आहे. या योजनेवर पुढील सहा महिन्यांसाठी, म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यंत आणखी 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या योजनेवर होणारा एकूण खर्च 3.40 रुपये कोटी इतका असणार आहे. 
 
या योजने अंतर्गत , 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धन्यवाटप केले जाणार असून त्याचा संपूर्ण खर्च भारत सरकार करणार आहे. या सहा महिन्यात प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्यासाठी रेशन धान्याव्यतिरिक्त आणखी पाच किलो धान्य प्रति व्यक्ती प्रति महिना दिले जाणार आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला, त्यांच्या नेहमीच्या धान्यापेक्षा दुप्पट धान्य मिळणार. 
 
स्थलांतरित कामगारांना या योजनेचा लाभ घेताना, एक देश एक शिधापत्रिका योजनेनुसार, त्यांना देशात कुठेही धान्य घेता येईल. या योजनेमुळे घरापासून दूर असलेल्या 61 कोटी पेक्षा अधिक लोकांना फायदा होईल.