मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2024 (16:40 IST)

Cyclone Remal: चक्रीवादळ रेमल उद्या धडकणार, या राज्यात भारतीय हवामान खात्यानं अलर्ट दिला

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्वी हे या हंगामातील पहिले चक्रीवादळ आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत तीव्र चक्री वादळ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार.या चाकरी वादळाला रेमल असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे ताशी 102 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
  
26-27 मे रोजी पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना 27 मे पर्यंत किनारपट्टीवर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

IMD ने कोलकाता, हावडा, नादिया, झारग्राम, उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की समुद्राच्या पृष्ठभागाच्या उष्ण तापमानामुळे चक्री वादळे वेगाने त्यांचा वेग वाढवत आहेत
 
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र सध्या खूप उष्ण आहे, त्यामुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ सहज तयार होऊ शकतात. उष्णकटिबंधीय चक्रीवादळे केवळ महासागराद्वारे नियंत्रित होत नाहीत, तर वातावरणही महत्त्वाची भूमिका बजावते.'याचा परिणाम मान्सूनवर होणार

आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन मॉड्यूल्सचा दावा आहे की रेमल रविवारी धडकू  शकते. असा दावा केला जात आहे की हे वादळ प्रामुख्याने बांगलादेशात धडकताना दिसत आहे, परंतु ते कधीही आपला मार्ग बदलू शकते.बांगलादेशच्या सुंदरबनपासून ते ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत कुठेही त्याचा भूभाग होऊ शकतो.
 
Edited by - Priya Dixit