मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (16:22 IST)

दाऊदची हवेली अवघ्या ११ लाखात विकली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी खेडमधील मूळगावची हवेली अखेर अवघ्या ११ लाख रूपयातच लिलाव प्रक्रियेत विकली गेली. याआधी दोनवेळा लिलाव प्रक्रियेला कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. पण मंगळवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेत हवेली अवघ्या ११ लाख रूपयात लिलाव प्रक्रियेत विकली गेली. दाऊदच्या सहा प्रॉपर्टीच्या लिलावाची प्रक्रिया वाणिज्य मंत्रालयाने हाती घेतली होती. त्यापैकी रत्नागिरी येथील मुंबके या गावी दाऊदची हवेली होती. अजय श्रीवास्तव या व्यक्तीला या हवेलीची मालकी मिळाली आहे.
 
तर आणखी ४ मालमत्ता या दिल्लीस्थित भुपेंद्र भारद्वाज या वकिलाने जिंकल्या आहेत. एकुण ६ जागांसाठी सेफमा म्हणजे स्मगलर्स एण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव सुरू आहे. 
 
केंद्रीय वित्त मंत्रालयाने याआधीच रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेच्या लिलावाच्या रकमा निश्चित केल्या होत्या. त्यानुसार दाऊदच्या मूळ गाव असलेल्या मुंबके गावातील मालमत्तेची रक्कम १४ लाख ४५ हजार रूपये, तर लोटे येथील आंब्याच्या बागेची किंमत ६१ लाख ४८ हजार रूपये इतकी कमाल रक्कम निश्चित करण्यात आली होती.