सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, पैतृक संपत्तीत मुलीला समान वाटा
सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असं स्पष्ट केले आहे. वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असं स्पष्ट केले आहे.
आपल्या पित्याच्या मालमत्तेत मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील असे 2005 मध्ये अधिनियमित केले गेले होते. परंतु, हा कायदा 2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते. आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
जस्टिस मिश्रा आपल्या आदेशात म्हणाले की, 'मुलगी जीवनभरासाठी प्यारी मुलगी असतेअसते. प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी म्हटले की 'वन्स ए डॉटर, ऑलवेज ए डॉटर'.
2005 सालात 1956 च्या कायद्यात बदल केला. यात मुलींना समान वाटा देण्याचे सांगितले गेले. आता कायद्यात बदल करण्यात आला असून मुलीला समान वाटा मिळणार आहे.