रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (00:15 IST)

आसामच्या वसतिगृहाच्या खोलीत सापडला दहावीच्या विद्यार्थ्याचा हातपाय बांधलेला मृतदेह

आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वसतिगृहातून एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. हा विद्यार्थी इयत्ता दहावीत शिकत होता. 

वसतिगृहाच्या खोलीत गूढ परिस्थितीत मृतावस्थेत हा विद्यार्थी आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. गमरीन मुकुट असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो लेखपाणी येथे राहायचा.
 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उदयपूर, तिनसुकिया येथील शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थी मृतावस्थेत आढळून आला. "आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत्यूची नेमकी परिस्थिती अद्याप समजू शकलेली नाही,"

या विद्यार्थ्यांचे हात पाय दोरीने बांधलेले असून तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विद्यार्थ्यांनी सकाळी मृतदेह पहिला. कुटुंबीयांनी हे प्रकरण हत्येचे असून आरोपीना अटक करण्याची मागणी केली आहे. 

याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करत स्थानिक लोकांनी महामार्ग रोखून धरला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला असून तपासाची मागणी केली आहे. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
 शाळेशी संबंधित लोकांना या घटनेने धक्का बसला असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 
Edited by - Priya Dixit