Biodata Maker marathi
✕

त्यागीनंद महाराजांचे निधन

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:00 IST)
 
सिहोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी गिरीश धुर्वे यांनी सांगितले की, संत त्यागी महाराजांची गाडी भरधाव वेगात असावी आणि ट्रॉलीला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले असावे, त्यामुळे कार अपघाताचा बळी ठरली. त्याचबरोबर धुके आणि अतिवेग हे देखील अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. कारमधील ४ जण बचावले गाडीत सात जण होते. अपघाताच्या वेळी संत त्यागी महाराज चालकाच्या शेजारी बसले होते. अपघातादरम्यान कारमधील इतर चार जण पूर्णपणे सुरक्षित आहेत. सिहोरा पोलिसांनी मृतांचे मृतदेह पीएमसाठी पाठवले आहेत. त्यागी नंद महाराज यांची महाराष्ट्रातील नांदेड येथील नामवंत संतांमध्ये गणना होते, त्यांच्या निधनामुळे त्यांच्या शिष्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
 
कोण होते त्यागी महाराज?
पुणेगाव येथील मठाचे योगी त्यागी महाराज यांचे जिल्ह्यासह राज्यभरात भक्त आहेत. दरवर्षी ते पुणेगाव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्या निमित्त उत्तराखंड येथील गुरुंच्या भेटीसाठी ते दोन दिवसांपूर्वी पुणेगाव येथून कारने निघाले होते. चालकासह या कारमध्ये सात जण होते. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments