बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (19:05 IST)

बसपा नेत्याच्या मुलाचा मृतदेह सापडला, कुटुंबियांना हत्येची शक्यता

बहुजन समाज पक्षाच्या (BSP)नेत्याच्या मुलाचा मृतदेह ग्रेटर नोएडामध्ये सापडला आहे. कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. राहुल असे मृताचे नाव असून तो दादरी येथील पल्ला गावचा रहिवासी आहे. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरजपूर पोलीस स्टेशन या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलीस स्टेशन सुरजपूर हद्दीतील जुनपत येथे रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.