बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (16:42 IST)

आईने मुलाला 10 व्या मजल्यावर लटकवलं ,कारण जाणून आपण थक्कच व्हाल !

बऱ्याच वेळा आपण लहान मुलं बाल्कनीतून खाली पडल्याच्या बातम्या ऐकतो. पण एका आईने आपल्या मुलाला 10 व्या बाल्कनीतून खाली लट्कवल्याची बातमी आपण प्रथमच ऐकली असेल .या मागील कारण ऐकून आपण थक्कच व्हाल. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हीघटना आहे. हरियाणातील फरिदाबाद शहरातील. इथे एका सोसायटी मध्ये 9व्या मजल्यावर बाल्कनीत पडलेले उचलण्यासाठी एका महिलेने मुलाला साडीने बांधून लटकवले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आता या महिलेला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. 
हा व्हिडिओ ग्रेटर फरीदाबादच्या सेक्टर-82 च्या फ्लोरिडा सोसायटीच्या गेल्या आठवड्याचा आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला सोसायटीच्या 10व्या मजल्यावर कुटुंबासोबत राहते. त्यांचे कपडे नवव्या मजल्यावरील बाल्कनीत पडले होते. तो फ्लॅट बंद होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिलेने मुलाला साडीने बांधले आणि कपडे आणण्यासाठी नवव्या मजल्यावर पाठवले. मुलाने कापड घेतल्यानंतर, नंतर साडीच्या साहाय्याने ते मागे खेचते. महिलेसोबत एक वृद्ध महिला आणि एक मुलगीही दिसत आहे. त्याचवेळी एका शेजाऱ्याने त्याच्या मोबाईलवरून हा व्हिडिओ बनवला. आता या महिलेला या घटनेचा पश्चाताप होत आहे. 
 
मुलाचे म्हणणे आहे की चूक झाली आहे. मी अशी रिस्क कधीच घेणार नाही. सोसायटीचे रहिवासीनी सांगितले की, महिलेने बिल्डरच्या ऑफिसची मदत घ्यायला हवी होती. तिला काहीच समजले नाही, असे महिलेचे म्हणणे आहे. तिने मोठी चूक केली आहे.