सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (20:40 IST)

काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद, 4 जखमी

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक पोलिस शहीद झाले  असून 4 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
शुक्रवारी, जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती दिली की, बांदीपोरामध्ये गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. पोलीस आणि केंद्रीय राखीव निमलष्करी दल (CRPF) यांच्या संयुक्त पथकावर हा हल्ला करण्यात आला.
 
या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. ज्यात एक पोलीस शहीद झाला होता. शहीद जवानाचे नाव एसपीओ जुबैद अहमद असे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून त्यांचा शोध सुरू केला आहे.