गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (21:05 IST)

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणः मुख्यमंत्री केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

delhi cm arvind kejriwal
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे.
 
केजरीवाल यांनी प्रकृतीचे कारण देत सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता.त्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की केजरीवाल यांच्या आजाराबाबत तुरुंग प्रशासनाने चौकशी करावी. 
 
केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला विरोध करताना ईडीने म्हटले होते की, केजरीवाल न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. सतत प्रचार करणाऱ्या केजरीवाल यांची प्रकृती शरणागती पत्करण्याची वेळ आली तेव्हा बिघडल्याचा आरोप ईडीने केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण आणि त्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे.  अरविंद केजरीवाल यांनी तब्येतीच्या कारणास्तव दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

प्रकृतीचे कारण देत केजरीवाल यांनी तपासासाठी सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता.  तपास यंत्रणा ईडीने केजरीवाल न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचे म्हटले होते. सतत प्रचार करणाऱ्या केजरीवाल यांची प्रकृती शरणागती पत्करण्याची वेळ आली तेव्हा प्रकृतीत बिघाड झाल्याचा आरोप ईडीने केला.

न्यायालयाने दोन्ही बाजूचे पक्ष ऐकल्यावर राखून ठेवलेला निर्णय आज बुधवारी सुनावलं. न्यायालयाने केजरीवालांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली असून आता त्यांना 19 जून पर्यत तुरुंगात राहावे लागणार आहे. तसेच न्यायालयाने तुरुंगातील अधिकाऱ्यांना केजरीवाल यांच्या प्रकृतीची काळजी आणि वैद्यकीय गरजांची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. या वर केजरीवालांच्या वकिलाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहे.
Edited by - Priya Dixit