दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले; आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले होते
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच ताब्यात घेण्यात आले. जे सीजेपीच्या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले होते.
'कॉकरोच जनता पार्टी'चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपके यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांना मुंबईहून आल्यावर ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी विमानतळावर आगमन होताच दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर विमान उतरताच पोलिसांनी विमानात प्रवेश करून अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले. पोलिसांचे म्हणणे आहे की, 'कॉकरोच जनता पार्टी'ला आंदोलन करण्याची परवानगी मिळालेली नाही आणि त्यामुळे ते आंदोलनासाठी जंतर मंतरवर जाऊ शकत नाहीत.
