1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (22:28 IST)

ज्ञानदेव वानखेडेंच्या दाव्यावर उद्या सुनावणी; नवाब मलिकांनी उच्च न्यायालयाला केली ‘ही’ विनंती

Dnyandev Wankhede's claim to be heard tomorrow; Nawab Malik made this request to the High Court
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी आरोपांचा सुरसपाटा लावला आहे. मलिकांनी वानखेडे यांच्यावर वैयक्तिक केलेल्या आरोपानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे  यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे  यांनी हाय कोर्टात धाव घेतली. आणि कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र याप्रकरणी उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, त्यावेळी वानखेडे यांच्या बाबात काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची मुभा मिळावी. अशी विनंती मलिकांच्या वतीने कोर्टात करण्यात आलीय.
समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवताना घोटाळा केल्याचा आरोप नवाब मलिकांनी  केला होता.त्यांचं कुटुंब मुस्लिम असल्याचं व त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचं मलिक यांनी निदर्शनास आणलं होतं. या आरोपामुळे गोंधळ उडाला होता.
तर, मलिक यांच्या या आरोपांविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली.यावरुन कोर्टात सुनावणी झाली व कोर्टानं दोन्ही पक्षकारांना आपापल्याला म्हणणं सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यावर उद्या (गुरुवारी) सुनावणी होणार आहे.
दरम्यान, तत्पूर्वी, काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याचा नवाब मलिक यांनी परवानगी मागितली.तर, ‘समीर वानखेडे यांना मुंबई महापालिकेनं दिलेल्या जन्मदाखल्याची प्रत,शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे नवाब मलिक यांना सादर करायची असल्याचं कळते.