मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (11:32 IST)

महिलेने रस्त्याच्या मधोमध कॅब चालकाला मारहाण केली

The woman beat the cab driver in the middle of the roadमहिलेने रस्त्याच्या मधोमध कॅब चालकाला मारहाण केली Marathi National news  I Webdunia Marathi
नवी दिल्ली. पश्चिम पटेल नगरमधील भ्रर रस्त्यावर एका स्कूटी स्वार महिलेने कॅब चालकाला बेदम मारहाण केली. महिलेने मारहाण केल्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली. कॅब चालकाची ओळख पटल्यावर तो फरिदाबाद येथे सापडला. याप्रकरणी कॅब चालकाने कोणतीही तक्रार दिलेली नाही.
 
तपासात हा व्हिडिओ पश्चिम पटेल नगर येथील कस्तुरीलाल आनंद मार्गावरील असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती. स्कूटीवर स्वार असलेली ही महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, पण कॅब उभी असल्याने ती निघू शकली नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने स्कूटी उभी करून कॅब चालकाला मारहाण करणे सुरु केले. व्हिडिओमध्ये महिला कॅब ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याच्या तोंडावर चापट मारताना दिसत आहे. तेथे उपस्थित लोक महिलेला दोष देत आहेत. एक पुरुष व्हिडिओ बनवत आहे, ज्याला ती महिला सतत धमकावत आहे आणि व्हिडिओ बनवण्यापासून रोखत आहे. महिलेने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता काही लोकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला आणि महिला त्यांना धमकावत असल्याचे दिसून आले.