शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (12:17 IST)

सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात, विवाहासाठी धर्मांतर मंजूर नाही: राजनाथ सिंह

‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपाशासीत राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कठोर कायदे तयार केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की देशात सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात तसेच विवाहासाठी धर्मांतर मंजूर नाही.
 
राजनाथ सिंह म्हणाले, अनेक ठिकाणी सामूहिक धर्मांतर होत असल्याचे समोर येत आहे आणि हे थांबलंच पाहिजे. तसेच विवाहासाठी धर्मांतर करायला लावणं वैयक्तिकदृष्टीने मला योग्य वाटतं नाही.
 
तसेच, अनेक प्रकरणात जबरदस्तीने, लालच दाखवून देखील धर्मांतर केलं जातं. स्वाभाविकरित्या विवाह होणे आणि लालूस धर्मांतर करुन विवाह लावणं यात फार फरक आहे. म्हणून राज्य सरकार सर्व गोष्टी लक्षता ठेवून कायदा तयार करत आहे. खरा हिंदू जात-पात किंवा धर्माच्या आधारावर कधीच भेदभाव करणार नाही. असं सिंह यांनी म्हटलं.