बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 17 जानेवारी 2022 (09:52 IST)

2000 रुपयांसाठी नाल्यातील घाण पाणी प्यायला,व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक 60 वर्षीय व्यक्ती हातात नाल्यातले घाण पाणी पिताना दिसत आहे. ही बाब अटीशी संबंधित असून तीन दिवस जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आनंदपूर पोलीस ठाण्याच्या जावती गावातले आहे. गावातून बाहेर पडणाऱ्या नाल्यातील पाणी पिण्यासाठी  दोन हजार रुपये देऊ, अशी अजब अट गावच्या सरपंच पतीने ठेवली होती. त्यामुळे गावातील वृद्ध  पन्नालाल यांनी 2000 रुपयांसाठी नाल्यातील घाण पाणी प्यायले. लोकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला, जो आता व्हायरल होत आहे. पोलीस स्टेशन प्रभारी आनंदपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. ही बाब निदर्शनास आली असून, तपास सुरू आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वृद्ध व्यक्ती नाल्याजवळ बसून हाता मध्ये पाणी भरल्यानंतर पीत आहे.


यामध्ये आजूबाजूला उभे असलेले लोकही या कामासाठी त्यांचे  कौतुक करत आहे . यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना पलीकडे नेले. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला याचीही माहिती गोळा केली जात आहे.