मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले
रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. माहितीनुसार हा भूकंप बारामुल्ला येथे झाला.
भारतासह जगभरात भूकंपांच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील विविध राज्यांमधून भूकंपाच्या बातम्या येत आहे. आता रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी पहाटे भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी मोजण्यात आली. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलीवर होता. आतापर्यंत कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Edited By- Dhanashri Naik