1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Earthquake tremors felt in Mizoram

मिझोराममध्ये मंगळवारी रात्री उशिरा भूकंप! लोकांमध्ये भीतीचे वातावरण

मिझोराममध्ये मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतासह जगातील विविध भागात भूकंपाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलिकडच्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये भूकंपामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही अलीकडच्या काळात अनेक राज्यांमध्ये भूकंपाच्या घटना वाढत आहे.
भारताच्या उत्तर-पूर्व भागात मिझोराम या राज्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. मंगळवारी रात्री उशिरा मिझोराममधील चंफई जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणले आहे. मिझोराममधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 इतकी मोजली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू चंफई जिल्ह्यात पृथ्वीपासून 24 किलोमीटर खोलीवर होता.
पुढील लेख
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा! पीक नुकसानीसाठी प्रति हेक्टर ११,००० ते ३०,००० रुपयांपर्यंतची मदत मिळणार