उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, चारधाम यात्रेदरम्यान लाखो यात्रेकरू अडकले
उत्तराखंडमध्ये भूकंप : चारधाम यात्रेदरम्यान उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यामुळे धरधाम दर्शनासाठी आलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 9.52 च्या सुमारास चमोली आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले, त्यानंतर लोक घर, कार्यालय आणि दुकानातून बाहेर आले.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 इतकी मोजण्यात आली आहे. मात्र, भूकंपामुळे जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. भूकंपाच्या धक्क्याने स्थानिक नागरिकांसह भाविकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.