शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (07:58 IST)

Bihar Earthquake:बिहारच्या अररियामध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता 4.3 रिश्टर स्केल

बिहार भूकंप: बिहारच्या अररिया जिल्ह्यात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे 5.35 च्या सुमारास अररियामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी होती.
 
भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी पहाटे पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये अशाच तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. सिलीगुडीच्या दक्षिण-पश्चिमेला 140 किमी अंतरावर झालेल्या भूकंपाचे धक्के प्रथम राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) नोंदवले. बुधवारी पहाटे 5:35 वाजता भूकंप झाल्याचे एनसीएसने सांगितले. कोणतेही नुकसान झाले नाही.
Edited by : Smita Joshi