गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (20:08 IST)

नॅशनल हेराल्ड प्रकरण: सोनिया आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस, 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावले

rahul sonia gandhi
अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मोठी कारवाई केली आहे.नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. आम्हाला घाबरवण्यासाठी हे केले जात आहे, पण आम्ही घाबरणार नाही आणि झुकणार नाही. धैर्याने सामोरे जाऊ. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले आहे.