गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (15:54 IST)

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीची धाड, अटक केले

amantulla khan
ईडीचे पथक आज सकाळी आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याघरी पोहोचले शोध मोहीम राबवाल्यांनंतर तासाभरातच त्यांना अटक केली. x वर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली. 

आमदारांना घेऊन ईडीचे पथक कार्यालयात पोहोचले.ईडीच्या कार्यालयाच्या भोवती सर्व रस्ते बंद करण्यात आले असून दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 
 
या वर प्रतिक्रिया देत अमानतुल्ला म्हणाले, शोध वॉरंटच्या नावाखाली ईडीचे पथक मला अटक करण्यासाठी माझ्याघरी आले असून मला अटक करण्याचे त्यांचे उध्दिष्ट आहे. 

आप पक्षाला त्रास दिला जात आहे. पक्ष फोडणे हे त्यांचे उद्दिष्टये आहे. आमचे पक्ष जे अपूर्ण काम आहे त्यांना पूर्ण करेल असे मी वचन देतो. हा खटला 2016 पासून सुरु असून सीबीआयने म्हटले आहे की कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार या प्रकरणात झालेला नाही. मी असे कोणतेही लाजिरवाणे काम केलेले नाही.मला पूर्ण विश्वास आहे की याआधी न्यायालयाकडून जसा न्याय मिळाला आहे, तसाच पुन्हा न्याय मिळेल.
Edited by - Priya Dixit