बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (17:17 IST)

एलफिन्सटन चेंगराचेंगरी हा घातपात ?

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे एलफिन्सटन चेंगराचेंगरी हा घातपात असल्याचा दावा या याचिकेत केला आहे.

फैजल बनारसवाला यांनी ही याचिका दाखल केली आहे. पीडितांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.न्यायमूर्ती गवई यांच्याकडे ही याचिका सादर करण्यात आली. याचिकेवर 5 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तसंच यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला आहे.

एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीआधी पत्रा कोसळल्याच्या, शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा उठल्या होत्या. परंतु अफवा उठल्याचा कोणताही उल्लेख या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांच्या जबाबात आढळला नाही. त्यामुळे या दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.