1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑगस्ट 2025 (09:20 IST)

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चकमक,एका दहशतवादी ठार

security forces
शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईदरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांना शनिवारी मोठे यश मिळाले, ज्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात शुक्रवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय लष्कर, एसओजी, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ या कारवाईत सहभागी आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे.
दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याने ही घटना सुरू झाली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला, त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
Edited By- Dhanashri Naik