संबंधित माहिती
- Accident: अंबाला येथे भीषण अपघातात सात ठार; 20 जखमी
- वरमाळा घालताच वर-वधूने एकमेकांना kiss केले, कुटुंबात लाठा-काठ्याने मारहाण
- नणंद भावजय एकमेकांच्या प्रेमात पडल्या, रात्र होताच दोघी जवळ येतात
- पिझ्झा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 9 जण आजारी, रुग्णालयात दाखल
- 30 वर्षांनंतर मुलाने आईला न्याय मिळवून दिला, बलात्कार करणाऱ्या बापाला 10 वर्षांची शिक्षा
केदारनाथमध्ये मोठा अपघात टळला, पायलटसह 7 जणांना घेऊन हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
केदारनाथ यात्रेदरम्यान पायलटसह सात जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर हिमालय मंदिराजवळील हेलिपॅडपासून काही मीटर अंतरावर उतरले. पायलटसह विमानातील सातही जण सुरक्षित असल्याची पुष्टी अधिकाऱ्याने केली.
हेलिकॉप्टर पायलटच्या हुशारीमुळे अनेक यात्रेकरूंचे प्राण वाचू शकले. क्रिस्टलच्या हेलिकॉप्टरचे रडर खराब झाल्याने प्रवाशांनी भरलेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगचा व्हिडिओही समोर आला आहे. हेलिकॉप्टरला हेलिपॅडपासून 100 मीटर अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
VT-CLR, Leonardo A119 Koala, Kestrel Aviation, Kedarnath base camp today
— Kaypius (@realkaypius) May 24, 2024
Miraculous escape from what looks like loss of directional control (rudder/servo failure?). Six 360° turns before setting down outside the helipad. Remarkably well controlled by the pilot. All safe. pic.twitter.com/LKpaUXuok4
क्रिस्टलच्या हेलिकॉप्टरचे रडर खराब झाल्याची माहिती मिळाली आहे. पायलटने हुशारीने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केले. हेलिकॉप्टर सुखरूप उतरल्यानंतर यात्रेकरूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा नेहमीच जोखमीची राहिली आहे. केदारनाथमध्ये गेल्या 11 वर्षांत 10 अपघात झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, हेलिपॅडच्या 100 मीटर पुढे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.