लसीकरण प्रमाणपत्रांवरील सुधारणा/अपडेशनशी संबंधित त्रुटी आता Co-WIN पोर्टलद्वारे सुधारित केल्या जाऊ शकतात
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारने सांगितले आहे की आता लसीकरण प्रमाणपत्रावरील सुधारणा किंवा अपडेशन संबंधित काहीही समस्या असल्यास किंवा या प्रमाणपत्रात काहीही त्रुटी आढळल्यास या समस्या आता Co-WIN पोर्टलद्वारे सुधारित केल्या जाऊ शकतात.
ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे ते आता कोविन पोर्टलवर त्यांच्या कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रात झालेल्या चुका सुधारू शकतील. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, नवीन अपडेटमध्ये, कोविन पोर्टलमध्ये एक सुविधा प्रदान केली जाईल ज्याद्वारे लसीकरण प्रमाणपत्रावरील नाव, जन्म वर्ष आणि लिंग यामधील अनवधानाने झालेल्या चुका दुरुस्त केल्या जाऊ शकतात.