1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जुलै 2025 (12:24 IST)

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

तामिळनाडूतील शिवकाशी येथे मंगळवारी सकाळी एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक कामगार जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील शिवकाशी जवळील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी मोठा स्फोट झाला. या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. चिन्नकमानपट्टी येथील एका कारखान्यात हा स्फोट झाला. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरुधुनगर जिल्ह्यातील एसपी म्हणाले, "शिवकाशी जवळील चिन्नकमानपट्टी येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी विरुधुनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik