सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 24 एप्रिल 2022 (09:58 IST)

पीएम मोदींच्या रॅलीच्या ठिकाणापासून 12 किमी अंतरावर शेतात स्फोट, एजन्सी तपासात गुंतल्या

Jammu Kashmir
जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील एका शेतात रविवारी सकाळी स्फोट झाला. हा स्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित सार्वजनिक सभेच्या ठिकाणापासून अवघ्या 12 किमी अंतरावर आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे हालचाल सुरु आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, सांबा जिल्ह्यातील बिश्नाह येथील लालियाना गावातील एका शेतात हा स्फोट झाला. स्फोटामुळे शेतात खड्डा तयार झाला आहे. विजेमुळे हा स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. जाहीर सभेच्या ठिकाणी दक्षता वाढवण्यात आली आहे. एसपी हेड क्वार्टर रमनीश गुप्ता, एसडीपीओ आरएसपुरा सुरेंद्र सिंह आणि एसएचओ बिश्नाह विनोद कुंडल स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.
 
कलम 370 रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान केंद्रशासित प्रदेशाला 20 हजार कोटींहून अधिक किमतीचे विकास प्रकल्प भेट देतील. याशिवाय 38 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव जमिनीवर घेतले जाणार आहेत.
 
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त, पंतप्रधान सांबा जिल्ह्यातील परगणामधून देशभरातील पंचायत प्रतिनिधींना संदेश देतील. अनेक अर्थांनी महत्त्वाच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मोदी राज्याला काही मोठी भेट देऊ शकतात. 
 
परगणामधूनच पंतप्रधान अमृत सरोवर योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 जलकुंभांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आली आहे. जम्मू आणि सांबासह संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.