शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (19:16 IST)

फोनच्या नादात महिला गटारात

smart phone
फरीदाबादच्या जवाहर कॉलनीतून जाणाऱ्या एका महिलेला फोनवर बोलणे चांगलेच महागात पडले, जेव्हा फोनवर बोलत असताना ती आपल्या मुलासह कॉलनीतील उघड्या गटाराच्या मॅनहोलमध्ये पडली.  
 
सुदैवाने आजूबाजूच्या लोकांना ही महिला मेन होलमध्ये पडताना दिसली आणि वेळ न दवडता लोकांनी महिलेला आणि तिच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. मुलाला बाहेर काढण्यासाठी एक तरुण मेन होलच्या आत उतरला आणि अथक परिश्रमानंतर महिला आणि तिच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले.