बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (09:28 IST)

शेतात किताकानाशक ऐवजी शेतकरी टाकत आहेत गावठी दारू

शेतकरी काबाडकष्ट करुन शेतात बि-बियाणं पेरतात मात्र रोपटं झाल्यावर या रोपट्यांवर किडे पडतात. आणि संपूर्ण पिकांची नासाडी होते आणि मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. मात्र नुकसानीवर गोंदिया जिल्ह्याच्या चारगांव गावातील शेतकऱ्यांनी वेगळाच उपाय शोधून काढला आहे. त्यांनी शेतातील पिकांचं किड्यांपासून रक्षण व्हावं, यासाठी शेतकरी आता पिकांवर चक्क गावठी दारुचा शिडकाव करत आहेत. किटकनाशकां ऐवजी दारुचा शिडकाव स्वस्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
 
एक वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील चारगांव गावातील शेतकरी हे पिकांना लागणाऱ्या किटकांपासून चांगलेच हैराण झाले होते. गावातील शेतकरी हे भातशेती करत होते.  त्यांना अस कळल की मध्य प्रदेश येथे भातशेती करणारे अनेक शेतकरी किटकनाशकं म्हणून गावठी दारुचा वापरतात, यामुळे त्यांना मोठा फायदा झाला आहे. चारगांवच्या शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीमध्ये दारुचा शिडकाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १६ लीटर पाणीमध्ये ९० एमएल गावठी दारुचे मिश्रण करुन त्याचा शिडकाव पिकांवर केला, यामुळे पिकांना कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. त्यामुळे यावर्षीदेखील शेतकऱ्यांनी पिकांवर दारुचा शिडकाव करण्याचा निर्णय घेतला. साधारणत: ५० शेतकरी आपापल्या शेतामध्ये गावठी दारुचा शिडकाव करत आहेत. हे शेतकरी जवळजवळ २००० हेक्टर जमिनीचे मालक आहेत. त्यामुळे कोणती गोष्ट कशाला उपयोगात येईल हे सांगता येत नाही त्यांच्या या अनोख्या उपाय मुळे हे शेतकरी चांगलेच चर्चेत आले आहेत.