1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2024 (14:44 IST)

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

राजस्थानची राजधानी जयपूर जवळील निकटवर्ती जमवारामगड मध्ये दौसा-मनोहरपूर राष्ट्रीय राजमार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. दोन एसयूवी गाड्या मध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लोक गंभीररित्या जखमी झाले आहे. 
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस वेळेवर पोहचलीत. या अपघातामुळे राजमार्गावर एकाच गोंधळ झाला तसेच खूप मोठा ट्राफिक झाला. पोलिसांच्या मते, मनोहरपूर-दौसा हायवे वर डागरवाडा जवळ हा अपघात झाला. ओव्हरटेक करतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर अली आहे. 
 
या भीषण अपघातामध्ये चार लोकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सहा लोक जखमी झालेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण रुग्णालयात नेत्यांना एकाचा मृत्यू झाला. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.