मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 नोव्हेंबर 2024 (15:50 IST)

ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

accident
Noida accident News:उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क पोलीस स्टेशन परिसरात नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेवर एक ट्रक खराब झाला होता आणि रस्त्याच्या कडेला उभा होता. मागून वेगवान येणारी कार या ट्रकमध्ये जावून धडकली. आणिभीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
अपघातातील वॅगनआर कारपरी चौकातून काशीराम कॉलनी, घोडी बछेडाकडे जात असताना सेक्टर-146 मेट्रो स्टेशनजवळ सकाळी 6 वाजता हा अपघात झाला. या कार मध्ये तीन महिला आणि दोन पुरुष प्रवास करत होते. कार कडेला उभ्या एका ट्रकला जॉन आदळली आणि कारचा चक्काचूर झाला. त्यात बसलेले पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. 

अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसेबसे मृतदेह बाहेर काढले.पोलिसांनी दोन्ही वाहने हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. घटनेनंतर मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
Edited By - Priya Dixit