1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (10:41 IST)

जिल्हा दंडाधिकारी घरात मृतावस्थेत आढळले

suicide
केरळमधील कन्नूरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) नवीन बाबू मंगळवारी सकाळी त्यांच्या गृहजिल्ह्यातील पथनामथिट्टाचे एडीएम म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी तेथे पोहोचणार होते परंतु ते त्यांच्या अधिकृत निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळले. तसेच एक दिवसापूर्वीच अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात जिल्हा पंचायत अध्यक्षांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील कन्नूर येथील जिल्हा प्रशासनातील एक उच्च अधिकारी मंगळवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. एक दिवसापूर्वीच अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात जिल्हा पंचायत अध्यक्षांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.तसेच या घटनेने केरळ राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नूरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) नवीन बाबू मंगळवारी सकाळी त्यांच्या गृहजिल्ह्यातील पथनामथिट्टाचे एडीएम म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी तेथे पोहोचणार होते, परंतु ते त्यांच्या निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळले.
 
तसेच याच्या एक दिवस आधी, सोमवारी नवीन बाबू यांच्या सहकाऱ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. अधिकृत निमंत्रण न देता आलेले जिल्हा पंचायत अध्यक्ष आणि सीपीआय(एम) नेते पीपी दिव्या यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

Edited By- Dhanashri Naik