शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (10:50 IST)

भीषण आग : घरातील दोन जण जिवंत जळाले

fire
राजधानी दिल्लीतील शाहदरा परिसरात एका घराला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जळाले आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील शाहदरा भागात शुक्रवारी एका घराला आग लागली. आगीमुळे घरात उपस्थित दोन जण जिवंत जळाले असून घरामध्ये दोन जळालेले मृतदेह आढळले आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.24 वाजता शाहदरा येथील एका घराला आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि पथक घटनास्थळी दाखल झाल्या. 
 
घराला आग लागली तेव्हा तेथे चार जण उपस्थित होते. यापैकी दोन जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर दोन मुलांची सुटका करून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली.  

Edited By- Dhanashri Naik