बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (10:12 IST)

पेट्रोलची टाकी भरून घ्या, मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार आहे- राहुल गांधी

'पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे", असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 
"भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. शिवाय भाजपचे लोक संपूर्ण देशात हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा आहे.

परंतु, भाजपचे लोक खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. पंतप्रधान मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक आपापली खूर्ची वाचवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.