राजकोट शहरात निवासी इमारतीला भीषण आग, ४० जणांना वाचवण्यात आले
Rajkot News : गुजरातमधून मोठी बातमी समोर येत आहे. राजकोट शहरातील अटलांटिस अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे हे घडले. आगीत तीन जणांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. इमारतीत अजूनही ३० लोक अडकल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील राजकोट शहरात शुक्रवारी सकाळी एका १२ मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान, आणखी एक जण जखमी झाला. रिंग रोड परिसरातील १५० फूट उंचीच्या टॉवरमध्ये अडकलेल्या सुमारे ४० जणांना वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणाले, 'सकाळी ९.३० वाजता अटलांटिस अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे हे घडले. आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
Edited By- Dhanashri Naik